
संस्थेची कार्ये
1) शिरीषालय वृद्धसंकुल
शिरीषालय वृध्दसंकुलाची सुरुवात सर्व गरजू ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्यात कोणत्याही धर्माचा विचार न करता त्यांना आधार देऊन त्यांचे उर्वरित आयुष्य निरामय ,आनंदी व समाधानी करणे या उद्देशाने नोव्हेंबर 2016 मध्ये शिरगाव गणेशवाडी ता. जि. रत्नागिरी येथे करण्यात आली. या वृद्धसंकुलात एकोणीस वृद्धांना राहण्याची क्षमता आहे. सुरुवातीला एका वृद्धाच्या प्रवेशाने याची सुरुवात केली गेली व आता चालू वर्षात 19 वृद्ध या शिरिषालयाचा लाभ घेत आहेत. आजपर्यंत गेल्या सहा वर्षात 70 ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घेतला. या वृध्दसंकुलामध्ये चालतेफिरते ज्येष्ठ नागरिक, कायमस्वरूपी अंथरुणाला खिळलेले वृद्ध, तात्पुरत्या स्वरूपात राहण्यास आलेले, नितांत काळजी घेण्याची गरज असलेले तसेच Amnesia Alzheimer आजार असलेले अशा सर्वांचा या वृद्धसंकुलात समावेश केला गेला आहे.
2) गावपातळीवर आरोग्य शिबीर राबविणे
संस्थेमार्फत गावपातळीवर आरोग्य शिबिरे राबविली जातात. यात प्राथमिक आरोग्य तपासणी, वैद्यकीय सल्ला नेत्रतपासणी इ. चा समावेश होतो. या शिबिरामध्ये गावपातळीवरून ग्रामस्थांचा चांगल्या सहभाग मिळतो. या उपक्रमांचा लाभ चांगल्याप्रकारे ग्रामस्थांना होतो आहे.


आमची खासियत
कोकणासारख्या निसर्गरम्य वातावरणात जेष्ठ नागरिकांसाठी खुले असलेले वृद्धसंकुल हे २४ तास ७ दिवस वैद्यकीय सेवांसहित तप्तरतेने सेवा पुरविते. सिव्हिल हॉस्पिटल मधून सुप्रशिक्षित व अनुभवी सेवानिवृत्त मेट्रन श्रीम. वीणाताई लेले या स्वतः लक्ष देऊन जेष्ठ नागरिकांसाठी उत्तम सेवा देत आहेत.
आमची वैशिष्ट्ये
-
महिला ५५ व पुरुष ६० वर्षावरील गरजु वृद्धांची निवास व्यवस्था सोयी सुविधांसह उपलब्ध.
-
निवासी वृद्धांसाठी प्रार्थना, वाचन, खेळ, व्यायाम, योगा, मनोरंजन कार्यक्रम या माध्यमातून वेळेचे नियोजन.
-
वृद्धांना पचेल आणि रुचेल असा शाकाहारी नाष्टा व जेवण.
-
चालू असलेले वृद्धांचे वेळेत औषधोपचार.
-
आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास वृद्ध आजारी पडल्यास त्याच्यावर तातडीने उपचार.
-
वेळोवेळी प्राथमिक आरोग्य तपासणी.
-
वृद्धांना वातावरणात बदल म्हणून पिकनिकचे आयोजन.
-
निवासी वृद्धांच्या आरोग्याकडे प्रामुख्याने लक्ष व ते कायम निरोगी व आनंदी राहतील यासाठी प्रयत्न.

